बहुजननामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीच्या काळापासून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यापैकी, मास्क परिधान करणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्यपणे ठेवले आहे. दरम्यान, एका संशोधनात म्हटले आहे की, मास्क परिधान केल्याने त्याचा प्रसार रोखण्यास तसेच लोकांच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मोनिका गांधी आणि जॉर्ज डब्ल्यू. रदरफोर्ड यांनी म्हटले की, फेस मास्कमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होतो. तसेच, यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, विषाणूजन्य रोगजनकांच्या एक दीर्घकालीन सिद्धांतासह ही शक्यता संबंधित आहे. जे मान्य करते की, रोगाची तीव्रता व्हायरल इनोकुलम (विषाणूचे संसर्गजन्य खंड) च्या प्रमाणात आहे.