बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यानमारच्या संसदेत सैन्याने कश्याप्रकारे तेथे प्रवेश केला आणि सत्ता बदलापूर्वी तेथील वातावरण कसे होते? एका महिला डान्सरच्या व्हिडिओमध्ये हे सर्व चुकून रेकॉर्ड झाले आहे. वास्तविक, महिला डान्सर संसद भवनाजवळ व्यायाम करताना व्हिडिओ रेकॉर्ड करीत होती. त्यावेळी सैन्याचा ताफा संसदेत घुसल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. खिंग हनिन वाई असे या महिला डान्सरचे नाव वर्णन केले जात आहे. वाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर 12 लाखाहून अधिक वेळा पहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये दिसून आले आहे की, सकाळी म्यानमारची राजधानी नायपिटॉ येथे अनेक एसयूव्ही संसद भवनाच्या दिशेने जात आहेत.
https://twitter.com/VonKoutli/
व्हिडिओमध्ये पहिले जाऊ शकते की, संसद भवनाजवळ बरेच बॅरिकेडिंग केले गेले आहे. असे असूनही, सैनिकांच्या ताफ्याला आत जाण्याची परवानगी मिळते. व्हिडिओवरून पाहू शकतो की, त्यावेळी डान्सरलाही कल्पना नव्हती की, तिच्या पाठीमागे काय घडत आहे आणि तिच्या कॅमेर्यात रेकॉर्ड होत आहे. नंतर व्हिडिओवर काही प्रश्न देखील उद्भवले, परंतु वाईने मंगळवारी नवीन व्हिडिओ पोस्ट करत प्रश्नांची उत्तरे दिली. वाई म्हणाली की, यापूर्वीही तिने त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. तिने म्हंटले की, सोमवारी तिने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ अगदी खरा आहे. वाईने म्हंटले की, गेल्या 11 महिन्यांपासून ती संसदे जवळ डान्स व्हिडिओ रेकॉर्ड करीत आहे.
वाईने फेसबुकवर स्वत: ला फिजिकल एज्युकेशन टीचर म्हंटले आहे. दरम्यान, म्यानमार सैन्याने सोमवारी सकाळी ऑंग सान सू की आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले आणि देशात आणीबाणी जाहीर केली.