Warje Malwadi Pune Crime News | दुसर्या समाजातील महिलेशी लग्न केल्याच्या गैरसमाजातून तरुणाला मारहाण करुन मोबाईल, रोकड केली लंपास
पुणे : Warje Malwadi Pune Crime News | दुचाकीवरुन जात असलेल्या तरुणाला अडवून दुसर्या समाजातील महिलेशी लग्न केल्याच्या गैरसमजातून तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली.
याबाबत रहाटणी (Rahatani) येथे राहणार्या एका ३९ वर्षाच्या तरुणाने वारजे पोलिसांकडे (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुलतानाराम सुतार (रा. गंगाधाम चौक, मार्केटयार्ड), वासुसिंग भाटी (रा. टिळेकरनगर, कोंढवा), दलपतसिंह देवडा (रा. भवानी पेठ), सवाईसिंग बाडमेर (रा. वारजे) यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजेतील माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ (Mai Mangeshkar Hospital) १७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हार्डवेअरचे सामान घेऊन दुचाकीवरुन कात्रजकडे जात होते. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी मोटारसायकलवरुन आले. फिर्यादी यांच्या दुकानात पार्टनर असलेल्या दुसर्या समाजातील महिलेशी फिर्यादीने लग्न केले, असा त्यांना गैरसमज झाला होता. त्यांनी फिर्यादी यांची गाडी थांबून त्यांना हाताने मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख ४ हजार रुपये असा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.