बहुजननामा ऑनलाईन टीम : बिहारमधील कैमूर जिल्ह्यात मॉब लीचिंगच्या घटनेने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एका प्रभागातील सदस्याच्या मुलाने एका युवकाला गोळ्या घालून ठार केले, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संतप्त जमावाने पोलिसांसमोर आरोपीला जोरदार मारहाण केली. इतकेच नव्हे तर लोकांनी त्याच्या छातीवर बसून त्याला मारहाण करत, जय श्री रामच्या घोषणा देखील दिल्या.
दरम्यान, केसूर जिल्ह्यातील भभुआ येथील शिवाजी चौकातील हा प्रकार आहे, जेथे भभुआच्या प्रभाग सदस्याच्या मुलाने एका युवकाला गोळी घातली. या घटनेनंतर संतप्त लोकांनी आरोपीला इतकी मारहाण केली की त्याची प्रकृतीही गंभीर आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांनी आरोपीच्या छातीवर चढून त्याला मारहाण केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. इतकेच नाही तर यावेळी पोलिसही घटनास्थळी हजर होते.
व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, तो तरुण गर्दीने घेरलेला असून तिथे एक पोलिसदेखील आहे. एक तरुण त्याच्या छातीवर बसून त्याच्या तोंडावर मुक्के मारत आहे. यानंतर आणखी एक तरुण त्याच्या छातीवर चढला. एवढेच नाही तर त्या युवकाला मारहाण केल्यानंतर त्या तरुणाने जय श्री रामचा जयघोष केला आहे. यावेळी, आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की पोलिस कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, परंतु तरुण त्यांना बाजूला करतात. यानंतर तो कर्मचारी बाजूला उभा राहून बघ्यांच्या गर्दीत सामील होतो.
आरोपीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. परंतु यानंतरही लोकांचा संताप कमी झाला नाही. लोकांनी पोलिसांकडून आरोपीच्या मृत्यूची मागणी करण्यास सुरवात केली, त्यानंतर या प्रकरणात आणखी खळबळ उडाली. जमावाने रुग्णालयाचा आपत्कालीन गेट तोडला आणि खिडकीवर दगडफेक केली. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांना लाठी मार करावा लागला. यावेळी उपद्रव करणारे लोकही जखमी झाले. तसेच दोन सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. तरीही जमावाने शांत न राहता त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर दगडफेक सुरू ठेवली.
यानंतर कैमूरचे एसपी रुग्णालयात दाखल होत शांतता राखण्याचे आवाहन केले. एसपी दिलनवाज अहमद म्हणाले की, परस्पर वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मात्र, भभुआ वॉर्ड सदस्याचा मुलगा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या घटनेचा एक व्हिडिओ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार आणि पश्चिम बंगाल सरकारचे माजी मंत्री मोहम्मद सलीम यांनी शनिवारी सकाळी ट्विटरवर पोस्ट केला होता, ज्यांनी त्याचे वर्णन पश्चिम बंगाल असल्याचे म्हटले आहे, परंतु ही घटना बिहारमधील कैमूरची आहे.
Visit : bahujannama.com