Wakad Pune Crime News | कर्मचार्याने बांधकाम व्यावसायिकाला घातला ८२ लाखांना गंडा
पिंपरी : Wakad Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाकडे काम करीत असलेल्या कर्मचार्याने अन्य दोघांच्या खात्यात पैसे वळवून बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ८२ लाख २५ हजार ३७० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत संदीप कृष्णा आलम (वय ५३, रा. सदगुरु सोसायटी, सेनापती बापट रोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोपट मुरलीधर नाटकर Popat Murlidhar Natkar (वय ५०, रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड), निर्मला पोपट नाटकर (वय ४५), गोरखनाथ रामनाथ शिंदाडे (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ मार्च २०२२ ते २सप्टेंबर २०२३ दरम्यान रहाटणी येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद आलम यांचे व्हिजन डेव्हलमपर्स अँड बिल्डर्स ही फर्म आहे. तेथे पोपट नाटकर हा कामाला होता. त्याने फिर्यादी यांचा विश्वासघात करुन फर्मचे ८२ लाख २५ हजार ३७० रुपये आपली पत्नी निर्मला नाटकर व गोरखनाथ शिंदोड यांच्या बँक खात्यावर वळवून फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत.
Comments are closed.