पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ‘जाती -पात सोडून मातीसाठी मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर येथे अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार ६० ते ६०’हजार मतांनी निवडून यायचे परंतु नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली आणि अजित दादा १ लाख मतांनी निवडून आले.आतादेखील नरेंद्र मोदी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. उलट आता आमचा उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून येणार,’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या संभाव्य बारामती दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.
तूर्तास मोदींच्या बारामती दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे .