मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वोडाफोन आणि आयडिया कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन आणला असून जिओ आणि एअरटेलला ते टक्कर देणार आहेत. वोडाफोन आणि आयडियाने आणलेल्या या प्लॅनचे नाव ‘बजेट रिचार्ज प्लॅन’ असे असून कमी किमतीमध्ये ग्राहकांच्या खिशाला परवडणारा हा प्लॅन आहे.
वोडाफोन कंपनीच्या नेटवर्कमध्ये अनेक अडथळे येत असून त्यांचे प्लॅनही महाग असल्यामुळे ग्राहक त्यांचा नंबर जिओ किंवा एअरटेल मध्ये पोर्ट करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळेच वोडाफोनने आपल्या ग्राहकांना परवडणार असा प्लॅन मार्केटमध्ये आणला आहे.वोडाफोनच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, १ GB डेटा आणि १०० SMS अशी सेवा मिळणार असून या प्लॅनची वैधता २१ दिवस असणार आहे.
रिलायन्स जिओचा १४९ रु.चा प्लॅन २४ दिवसांचा असून त्यामध्ये १ GB डेटा प्रतिदिन, १०० SMS प्रतिदिन आणि २४ दिवसांसाठी ३०० मिनिट फ्री मिळणार आहेत.
Visit : bahujannama.com