बहुजननामा ऑनलाईन – Vodafone लागोपाठ नवनवीन प्लान सादर करून देशातील आपला विस्तार वाढवत आहे. तसेच इतर कंपन्यांच्या तुलनेत कंपनी आपल्या सध्याच्या काही प्लानमध्ये बदलही करत आहे. कंपनीने नुकसात 99 रुपये आणि 555 रुपयांचा प्रीपेड प्लान सादर केला आहे. आता वोडाफोनने 997 रुपयांचा नवा लाँग टर्म प्लान आणला आहे.
टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, सध्या वोडाफोनचा हा नवीन प्लान निवडक सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच हा प्लॅन सर्व सर्कलमध्ये लागू केला जाईल असा अंदाज आहे.
वोडाफोनच्या 997 रुपयांच्या प्लानबाबत जाणून घ्यायचे तर हा एक लाँग टर्म प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे 180 दिवसाच्या मुदतीत ग्राहकांना एकुण 270 जीबी डेटा मिळेल. यामध्ये आणखी एक फायद्याची गोष्ट म्हणजे ग्राहक रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करू शकतात. ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ आहे.
याशिवाय 997 रुपयांच्या प्लानमध्ये वोडाफोन प्ले सब्सक्रिप्शनचा फायदा मिळेल. याद्वारे ग्राहक 999 रुपयांच्या किमतीच्या झी प्रीमियम कन्टेंटला अॅक्सेस करू शकतात.
कंपनीचा हा नवीन प्लॅन सध्याच्या 1,499 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लानच्या मध्ये उपलब्ध असेल. वोडाफोनच्या 1,499 रुपयांच्या प्लानमध्ये 12 महीन्यांच्या वॅलिडिटीत 24 जीबी डेटा मिळतो, तर 599 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांच्या वॅलिडिटीत रोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. बाकी फायदे 997 रुपयांच्या प्लानसारखेच आहेत.
याशिवाय कंपनीने काही दिवसांपूर्वीच 99 रुपये आणि 555 रुपयांचे प्लान्स ही आणले आहेत. वोडाफोनचा 99 रुपयांच्या प्लानला 18 दिवसांची वॅलिडिटी आहे. या प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबतच 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस सुद्धा वॅलिडिटीदरम्यान मिळतात. तसेच वोडाफोन प्ले आणि झी 5 सब्क्रिप्शनचा अॅक्सेस सुद्धा प्लानमध्ये मिळतो.
555 रुपयांच्या प्लान 71 दिवसांच्या वॅलिडिटीचा आहे. यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. सोबतच ग्राहक अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि झी 5 चे सब्सक्रिप्शन मिळते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा