मुंबई बहुजननामा ऑनलाईन – विवोने स्वंत्रतदिनानिमित्त व्हिवो फ्रिडम कार्निवलची घोषणा नुकतीच केली आहे. यानिमित्त विवोने ग्राहकांसाठी काही ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. त्या १२ ऑगस्ट पासून १४ ऑगस्ट या कालावधीत केवळ विवो ई- स्टोअरवर उपलब्ध असणार आहेत. कंपनी या विक्रीमध्ये सवलती, लकी ड्रॉ आणि कूपन देत आहे. कंपनीने सर्व स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक सवलती दिल्या आहेत.
नव्याने लॉंच झालेल्या विवो झेड १ प्रो स्मार्टफोनच्या एचडीएफसी डेबिट किंवा क्रेडीट कार्डच्या खरेदीवर पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहेत. कंपनी एक हजार रुपयांची कूपन देत असल्याने भविष्यात ई स्टोअरमधून खरेदी केल्यास त्याचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. विवो वाय ८३, विवो एक्स २१, विवो व्ही ९ आणि विवो वाय ७१ आय सारखे स्मार्टफोन अर्ध्या किमतीत ग्राहकांना मिळणार आहेत.
स्पीन अँड विन इव्हेंट च्या अंतर्गत वापरकर्ता विवोच्या ई स्टोअरमधून एक हजार रुपयांचे कूपन जिंकू शकतो. यासह vivo v15pro, vivo v15, Vivo y17, vivo y 15, किंवा vivo y 12 च्या खरेदीवर ग्राहकांना ७५९ रुपयांचे कूपन मिळणार आहेत.याचा वापर ग्राहक विवोच्या ई स्टोअरवरुन पुढील खरेदीसाठी करु शकतात. Vivo y 95, vivo 93, vivo Y91, vivo y91i च्या खरेदीवर बुक माय शोचे कपल मुव्ही तिकीट ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विवो सर्व ब्रॅंडवर आणि बजाज फिनवर्ड कार्डवर नो कास्ट ईएमआय वर फोनच्या ऑफर देत आहे.