बहुजननामा ऑनलाईन – भारतीय सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकारांच्या निधनानंतर अभिनेते नसिरूद्दीन शहा यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. पण नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती ठीक असून ते घरीच असल्याचे स्पष्टीकरण त्यांचा मुलगा विवानने ट्विट करत दिली आहे.मॅनेजर आणि स्वत: नसीरुद्दीन शाह यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपण ठीक असून लॉकडाउनचे पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
विवान शाहने ट्वीट करून, सर्व ठीक आहे. बाबा एकदम ठीक आहेत. त्यांचे स्वास्थ बिघडल्याच्या सर्व अफवा आहेत. त्यांनी इरफान भाई आणि चिंटूजीसाठी प्रार्थना केली आहे. दोन्ही कुटुंबाविषयी शोक व्यक्त केला. दोघांच्या आत्मास शांती लाभो.’ नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अफवा गुरूवारी रात्रींपासून सुरू झाल्या. या सार्या बांतम्यावर त्यांचे मॅनेजर जयराज यांनी पूर्णविराम दिला असून या सर्व अफवा असल्याचे म्हटले.
ते म्हणाले की, नसीरुद्दीन शाह पत्नी आणि मुलांसोबत कर्जत येथील फार्महाउसवर आहेत. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाह यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अफवा उडाल्या. त्याशिवाय धर्मेंद्र आणि बप्पी लहरी यांचीही प्रकृती बिघडल्याच्या अफवा उडाल्या होत्या.
एनपीन्यूज24 नेटवर्क