नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vitamin Deficiency Signs and Symptoms | आपल्या शरीराला रोज निरोगी राहण्यासाठी अनेक घटक गरजेचे आहेत. यामध्ये व्हिटॅमिनचा मोलाचा वाटा आहे. अनेक प्रकारचे व्हिटॅमिन शरीरात कार्य करतात. आणि त्यापैकी व्हिटॅमिन-ए हे एक महत्वाचे व्हिटॅमिन आहे. याला रेतीनोल सुद्धा म्हणतात. व्हिटॅमिन-ए शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) आहे,
जे मुक्त रॅडिकल्सच्या (Free radicals) हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करण्यास मदत करते. याशिवाय, शरीराच्या योग्य विकासात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच नवजात आणि लहान मुलांसाठी व्हिटॅमिन-ए खूप महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास व्हिटॅमिन-ए मदत करते. शरीरात व्हिटॅमिन- एची कमतरता (Vitamin-A deficiency symptoms) असल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. (Vitamin Deficiency Signs and Symptoms)
जाणून घेऊयात काय आहेत व्हिटॅमिन-ए कमतरतेची लक्षणे :
– थकवा जाणवणे
– फाटलेले ओठ
– अतिसार
– मूत्राशय संसर्ग
– दुखापत बरी न होणे
– मुलाच्या शारीरिक विकासाचा अभाव
– दृष्टी कमी होणे
– वरच्या आणि खालच्या श्वसनमार्गाचे संक्रमण
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या आणि रोग (Vitamin -A deficiency symptoms)
– अंधत्व / रात आंधळेपणा
– अशक्तपणा
– मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग
– प्रतिकारशक्ती कमकुवत होणे
– श्वसनमार्गाचे संक्रमण
– घसा आणि छातीत संक्रमण
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचा धोका जास्त आहे या लोकांना (Vitamin Deficiency Signs and Symptoms)
– यकृतचा आजार असलेल्या लोकांमधे व्हिटॅमिन- ए ची कमतरता भासू शकते.
– टीबी, कॅन्सर, न्यूमोनिया, किडनी इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन यापैकी कोणता आजार असल्यास ‘अ ‘ जीवनसत्वाची कमतरता होऊ शकते.
– गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये व्हिटॅमिन एच्या कमतरतेचा धोका असतो.
अ जीवनसत्वाची कमतरता टाळण्यासाठी
– व्हिटॅमिन-ए युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. जसे की आंबा, कलिंगड, गाजर, बीट, रताळे, टोमॅटो, ब्रोकोली, मटार इत्यादी हे.
– गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी ज्यानेकरून त्यांच्या शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही.
– डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी मुलांना ‘अ’ जीवनसत्त्वाचे पूरक आहार द्या.
Web Title :- Vitamin Deficiency Signs and Symptoms | signs and symptoms of vitamin a deficiency diseases in marathi
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात सरी
SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज