बहुजननामा ऑनलाइन – हाथरसच्या चारही आरोपींचे गुप्तांग कापणार्याला 25 लाख रुपये देण्याची घोषणा विश्व हिंदू सेनेचे(vishwa hindu sena) अध्यक्ष अरुण पाठक यांनी केली आहे. दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मध्यरात्री पीडिताचे अंत्यसंस्कार केल्यानंतर लोकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. (vishwa hindu sena)याप्रकरणात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशात मोदी आणि उत्तर प्रदेशात जेव्हा योगी सरकार आले, तेव्हा वाटले की धर्माचं शासन आले आहे. मात्र या सरकारमध्ये ब्राम्हण आणि दलितांमधील भाजपचा सदस्य न होणार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हाथरसमध्ये मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आता पीडितेच्या कुटुंबीयांवर पोलीस मानसिक बलात्कार करीत आहेत. उत्तर प्रदेशातील पोलीस जे काही करीत आहे, ते माफ करण्यालायक नाही. योगीच्या पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांचीही वाट पाहिली नाही. मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या आई-वडिलांना शेवटी मुलीचा चेहराही पाहायला मिळाला नाही. त्यामुळे हाथरसमधील चारही आरोपींचे गुप्तांग कापणार्याला 25 लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा आम्ही केली असल्याचे पाठक यांनी सांगितले.