Vishrantwadi Pune Crime News | पुणे : प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार करुन केला खून; प्रियकराला अटक
पुणे : Vishrantwadi Pune Crime News | गावाला असताना प्रेमसंबंध असतानाही दुसर्याशी विवाह केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी प्रेयसीचा शोध घेऊन तिच्यावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Murder In Vishrantwadi)
गौरी लणेश आरे (वय २५, रा. कळस माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) अमोल दिलीप कांबळे Amol Dilip Kamble (वय २५, रा. श्रमिकनगर, धानोरी) याला अटक केली आहे.
याबाबत लणेश धनाजी आरे (वय २४, रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस माळवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी आरे हिचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सासर आहे. तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला आहे. ती कळस येथे रहायला आली. आरोपी अमोल कांबळे हा तिचा वर्ग मित्र होता. गौरी हिने त्याच्यासोबत लग्न न केल्याने त्याचा त्याला राग होता. लग्न झाल्यानंतर गौरी हिचा शोध घेण्याचा अमोल याने खूप प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला गौरी पुण्यात कळस येथे रहात असल्याचे समजले. त्यानुसार तो कळस येथे आला. कळस माळवाडी येथील ट्रिनिटी स्कुलसमोरील रोडवरुन गौरी तिच्या मैत्रिणीबरोबर काल रात्री सव्वा आठ वाजता पायी घरी येत होती. त्यावेळी अमोल याने गौरी हिच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी ७ वाजता तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी सांगितले.
Comments are closed.