Vishalgad Encroachment | विशाळगडावर संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांचा धुडगूस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मुंबई : Vishalgad Encroachment | माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी गडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशाळगडचा नारा दिला होता. पण संभाजीराजे विशाळगडावर पोहचण्यापूर्वीच तेथिल परिसरात हिंसाचार झाला. तेथिल घरे आणि दुकानांची जाळपोळ झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह इतरांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावरूनच आता वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “विशाळगडावर अतिक्रमण झाले हे खरे आहे. पण अतिक्रमण हटवताना शासनाने त्या लोकांचे पुनर्वसन करावे लागते असा नियम आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे सैन्य म्हणजेच धारकऱ्यांनी धुडगूस घातला अशी आमची माहिती आहे. आणि जाणून बुजून तिथल्या लोकांना मारझोड करण्यात आली त्यांची दुकाने तोडली.” असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
Comments are closed.