बहुजननामा ऑनलाइन टीम – (Vodafone Idea) अर्थात VI ने नुकतेच खास गुजरातसाठी 148 आणि 149 रुपयांच्या दोन रिचार्ज योजना सादर केल्या होत्या. पण आता या दोन्ही योजनांची व्याप्ती कंपनीने वाढविली आहे. अशा परिस्थितीत गुजरातसोबत दिल्लीचे VI यूजर्सदेखील या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यास सक्षम असतील. या एक रुपयाच्या फरकाने या योजनेची वैधता आणि डेटामध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया.
VI प्री-पेड प्लॅन 148 रुपयाचा आहे. 149 रुपयांच्या रिचार्ज योजनेवर 18 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तसेच आपण अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. दुसरीकडे, जर आपण डेटाबद्दल बोलायचे म्हणले तर या योजनेवर दररोज 1 जीबी डेटा उपलब्ध आहे. दररोज जास्तीत जास्त 100 एसएमएस असतील. याव्यतिरिक्त, (Vi Movies) आणि (TV) प्रवेश उपलब्ध असतील. जर आपण 149 रुपयांच्या रीचार्ज योजनेबद्दल चर्चा केली तर ते 28 दिवसांच्या वैधतेसह येईल. या रिचार्ज योजनेवर आपल्याला जास्तीत जास्त 3 जीबी डेटा मिळेल. तसेच, दररोज 300 एसएमएस उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, आपल्याला (Vi Movies) आणि (TV)मध्ये प्रवेश मिळेल.
(VI) च्या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त एका रुपयाचा फरक आहे. तथापि डेटा आणि कॉलिंगमध्ये खूप फरक आहे. जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल, तर 148 रुपयांचे रिचार्ज करणे चांगले. ज्यामध्ये आपल्याला दररोज 1 जीबी डेटा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्हाला एकाचवेळी 3 जीबी डेटा हवा असेल तर तुम्ही 149 रुपयांमध्ये रिचार्ज करा. 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 10 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसह येतो.