नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन अशी ओळख असलेला विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 34 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. त्याचा वाढदिवस कालपासून सोशल मीडियावर (Social Media) साजरा केला जात आहे. वाढदिवसानिमित्त अनेक आजी आजी खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विराटच्या (Virat Kohli) चाहत्यांनीदेखील त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/ShahnawazDahani/status/1588485917349908481
या सगळ्यांमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) एका गोलंदाजाने दिलेल्या हटके शुभेच्छाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या गोलंदाजांचे नाव आहे शहनवाज दहानी (Shahnawaz Dahani). तो पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज आहे. त्याने विराटसोबतचा एक फोटो शेअर करत त्याने ह्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटो कॅप्शनमध्ये “विराट कोहलीने क्रिकेटला चांगले दिवस आणले आहेत, अशा व्यक्तीला शुभेच्छा द्यायला मी शनिवारची वाट पाहणार नाही.” असे लिहून हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/ShahnawazDahani/status/1588485917349908481
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) बोलायचे झाले तर आशिया चषकापासून (Asia Cup) त्याचा फॉर्म चांगला
सुरु आहे. ऑस्ट्रेलिया (Austrelia), आफ्रिका (South Africa) यांच्या विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये
विराट कोहलीने चांगली कामगिरी केली होती. तसेच सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत (T-20 World Cup)
आतापर्यंत विराटने चांगली खेळी केली आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने आतापर्यंत 220 धावा काढल्या आहेत.
यादरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Web Title :- Virat Kohli | pakistan bowler shahnawaz dahani virat kohli birthday today twitter
हे देखील वाचा :
Salman Khan | मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे सलमान खानने केलं कौतुक ; म्हणाला कि…
Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका