बहुजननामा ऑनलाईन टीम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma ) शर्मा यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. सोमवारी (दि. 11) त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. अनुष्काने (Anushka Sharma ) सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे, स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर आता विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे. विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
विराट आणि अनुष्का आई-बाबा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटी त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच चाहत्यांनाही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून विराट अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव गोच आहे. मात्र या सर्वांमध्ये विराटचा भाऊ म्हणजेच विकास कोहलीने शेअर केलेला फोटो खास चर्चेत आहेत. विकासने विराट अनुष्काच्या मुलीच्या इवल्याश्या पायांचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला खूप आनंद झाला असून आमच्या घरी एक परी आलीय, अशी कॅप्शन विकासने या फोटोला दिली आहे. फोटोवर वेलकम म्हणजेच तुझे स्वागत आहे असा मजकूरही लिहिलेला आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
सोमवारी (दि. 11) दुपारी चारच्या सुमारास विराटने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितले होते. जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार असे कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.