Viral Video | कलयुग ! मुलगा पैशांसाठी भररस्त्यात आईला फरफटत होता, कुत्र्याने दाखवली इमानदारी, पहा Video

Viral Video son dragging mother on road for money pet dog showed loyalty to owner video viral

तमिळनाडु : वृत्तसंस्था – Viral Video | कुत्र्यांची स्वामीनिष्ठा आणि इमानदारीचे अनेक किस्से नेहमीच ऐकायला मिळतात. तमिळनाडु (Tamil Nadu) च्या नामक्कल शहरात काहीसे असेच दृश्य पहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल (Social Media Viral Video) होत आहे. एक मुलगा आपल्या वृद्ध आईला भररस्त्यात पैशांसाठी मारत होता, तर तिचा पाळीव कुत्रा तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या व्यक्तीची आई नल्लम्मल (Son Beating Mother Viral Video) आपल्या पतीच्या निधनानंतर पोन्नेरिपट्टीमध्ये एकटीच राहात होती.
तिने अगोदरच आपली सर्व जमीन आपल्या मुलाच्या नावावर केली आहे.
ती जगण्यासाठी आता मोलमजूरी करते. नल्लम्मलचा मुलगा शनमुगम आता आईकडून, तिचे घर आणि कमाईसुद्धा हडपण्याचा प्रयत्न करत आहे.

https://twitter.com/vkvkmarwat/status/1429363864076886016?ref_src

रिपोर्टनुसार आई नल्लम्मलने तीन लाख रुपये घरातच जमा करून ठेवले आहेत.
शनमुगम आपल्या आईला रस्त्यावर फरफटत तिच्याकडून चावी हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. नल्लम्मलचा पाळीव कुत्रा (Dog Loyalty Viral Video) आपल्या मालकिणीला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करत होता.
त्याने शनमुगमवर अनेकदा हल्ला सुद्धा केला परंतु शनमुगमची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी कुत्र्याला तेथून पळवून लावले.
ज्यानंतर नल्लम्मल रस्त्यावर एकटीच असहाय आणि जखमी आवस्थेत पडलेली दिसत होती.

नंतर नल्लम्मलला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, मारहाणीचा हा व्हिडिओ वायरल झाल्याने पोलिसांनी शनमुगमला आपल्या आईला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात अटक केली.
तर फरार असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत.
एकुणच या घटनेवरून समजते की पोटची मुलेसुद्धा जन्मदात्रीच्या जीवावर उठू शकतात,
पण कुत्र्यासारखा इमानदार प्राणी शेवटपर्यंत आपल्या असहाय मालकाला साथ देतो.

Web Title : Viral Video | son dragging mother on road for money pet dog showed loyalty to owner video viral

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये गडबड, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन भाव

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात ‘हार्पिक’ पाजल्याच्या पत्नीच्या आरोपानंतर पतीची ‘आत्महत्या’, सुसाईड नोटमध्ये लिहलं…

Jan Ashirwad Yatra | नारायण राणे यांच्या ’जन आशीर्वाद यात्रे’वर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत दाखल केले 42 FIR