नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या धार स्थितमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना म्हणजे एक पोलीस अधिकारी आपल्या पत्नीला पोलीस स्टेशन परिसरामध्ये खूप मारहाण करत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक पोलीस अधिकारी आपल्या पत्नीला मारहाण करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारा पुरुष पोलीस अधिकारी आहे आणि संबंधित महिला ही त्याची पत्नी आहे. दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध असणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले होते. त्याचाच राग आल्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण केली आहे.
#WATCH Madhya Pradesh: Gandhwani Police Station Incharge Narendra Suryavanshi assaulted his wife in Dhar allegedly after she opposed his illicit relationship with another woman. SDOP Manawar says, “Narendra has been sent to district lines. Investigation is underway.” (11.02.2020) pic.twitter.com/11rK9DtoVd
— ANI (@ANI) February 12, 2020
या पोलीस अधिकाऱ्याचे नाव नरेंद्र सुर्यवंशी आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची अधिक चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तो पोलीस अधिकारी आपल्या पत्नीला केसांना पकडून खेचून मारहाण करताना दिसत आहे. त्या दरम्यान काही उपस्थितांनी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी नरेंद्र सुर्यवंशी याचे कुटुंब इंदोरमध्ये स्थित आहे. त्याच्या शासकीय निवासस्थानी गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक युवती राहत असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली होती. त्याची पत्नी त्या परिसरात पोहचली आणि गोंधळ सुरु झाला. सूचना मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली.