बहुजननामा ऑनलाइन : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एका तरुणाला भर रस्त्यात नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा विडिओ सध्या वायरल होत आहे. एका विद्यार्थिनीचे कपडे फाडल्याचा आरोपावरून त्याला विद्यार्थिनीसमवेत नागरिकांनीदेखील लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. दरम्यान, तेथे उपस्थित लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये आरोपी आपले नाव कबीर असल्याचे सांगत आहे.
व्हिडिओमध्ये पीडित मुलगी तरुणावर कपडे फाडल्याचा आरोप करताना दिसत आहे आणि लोकही असेच बोलताना दिसत आहेत. संबंधित माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या तरुणाला आपल्या ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर सध्या कारवाई सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओ आणि फोटोजच्या मदतीने ते या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान हे प्रकरण पोलिस सिव्हिल लाईन्स परिसरातील लोकोशेड पुलाजवळील आहे, जिथे विद्यार्थीनी दररोज कोचिंगसाठी येत असतें. या गोष्टीचा फायदा घेत हा आरोपी मुलगा रोज तिचा पाठलाग करीत असे. सोमवारीसुद्धा त्याने विद्यार्थिनीचा पाठलाग करत तिच्या कोचिंगजवळ पोहोचला आणि तिच्याशी जबरदस्ती करायला लागला. त्याने विद्यार्थ्यांचे कपडेदेखील फाडले.
या कृत्यामुळे विद्यार्थिनीने आरडाओरडा करण्यास सुरवात केली, ज्यामुळे जवळपासचे लोक जमले. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. विद्यार्थिनीने देखील आरोपीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तेथे उपस्थित असलेल्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनविला आणि व्हायरल केला. व्हिडिओमध्ये पीडित विद्यार्थी संपूर्ण घटनेचे वर्णन करीत आहे आणि प्रत्यक्षदर्शीही असेच बोलताना दिसत आहेत. अज्ञात व्यक्तीने पोलिसांना कळविल्याने पोलिस थोड्या वेळाने घटनास्थळी पोचले आणि आरोपीला अटक केल्यानंतर कारवाई सुरू केली.
या प्रकरणात सिव्हिल लाइन्सचे सीओ राजेश कुमार सिंह सांगतात की, एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत आम्हाला तक्रार मिळाली आहे. कोणीतरी त्याचा पाठलाग करुन शिवीगाळ केली व मारहाण केली. तक्रारीच्या आधारे पोलिस सिव्हिल लाइन्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा केलेल्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.