नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात आश्चर्यकारक छंद जोपासणारे लोक आहेत. काही लोकांना स्टंट करण्याची आवड असते , त्यातील काही उंचीवरून उडी मारतात तर काही इमारती चढतात. तर बर्याच लोकांना प्राण्यांसह स्टंट करण्याची आवड असते. तुम्ही हॉर्स राइडिंगचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्ही कोणाला शार्क राइडिंग करताना पाहिले आहे? परंतु हे प्रत्यक्षात घडले आहे, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाच्याही अंगावर काटे येतील.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लोकांना हैराण केले आहे. हा व्हिडिओ एका माणसाचा आहे जो समुद्रात व्हेल शार्क सारख्या मोठ्या माशाची सवारी करत आहे. हा व्हायरल व्हिडिओ सौदी अरेबियाच्या यानबू शहरातील लाल समुद्रातील आहे. जकी-अल-सबाही नावाचा एक माणूस समुद्रात आपल्या बोटीवर साथीदारांसह बसला होता. यावेळी, त्याच्या बोटजवळ अनेक व्हेल शार्क येतात . दरम्यान, त्या व्यक्तीने त्याच्या बोटीजवळील व्हेल शार्कवर उडी मारली आणि त्याच्या पाठीवर बसला.
شاهد عدد من شباب #ينبع
زاكي الصبحي
بادر الكبيدي
ياسر الرفاعييسبحون مع حوت او قرش #البهلوان
الذي يعتمد في غذائه على العوالق البحريةسالم السناني – ينبع
— صحيفة المدينة (@Almadinanews) August 16, 2020
व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, बऱ्याच व्हेल शार्क बोटीच्या भोवती फिरत आहेत आणि त्यापैकी एकाच्या पाठीवर हा व्यक्ती बसला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस ओरडताना ऐकू येतो, “सावधगिरी बाळगा, तो तुम्हला गिळू शकतो.” अल-सबाहीने या दरम्यान माशाचे पंख ( फिन) पकडले आहे आणि तो त्याची सवारी करत आहे. व्हिडिओ दिसत आहे कि ही व्यक्ती या माशाबरोबर बिनधास्तपणे खेळत आहे. महत्त्वाचे म्हणजे लाल समुद्रात व्हेल शार्कचे अस्तित्व दुर्मिळ आहे.