नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Viral Video | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000पेक्षा जास्त विकेट घेणारा मुथैया मुरलीधरन निश्चितच सर्वश्रेष्ठ स्पीनर आहे. आता श्रीलंकेच्या या दिग्गज गोलंदाजाने निवृत्ती स्वीकरली असतील तरी त्याच्या मुलाला नुकतेच गोलंदाजी करताना अनेकांनी पाहिले. त्याची गोलंदाजीची अॅक्शन हुबेहुब आपल्या वडीलांप्रमाणे आहे. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुरलीधरनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या आणि आपल्या मुलाच्या गोलंदाजीची तुलना करणारा व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तो आणि त्याचा मुलगा दोघे नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. मुरलीधरनने या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, वडील आणि मुलाचा काळ. यासोबतच व्हिडिओसाठी त्याने आयपीएल फ्रेंचायजी टीम सनरायजर्स हैद्राबादचे आभार मानले आहेत.
Father and Son Time! Video credits @SunRisers pic.twitter.com/Jv8fYOAZcp
— Muthiah Muralidaran (@Murali_800) July 15, 2021
मुरलीधरण सध्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद फ्रेंचायजीचा गोलंदाजीचा कोच आहे. तो अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन टीमचा भाग होता जिने 1996मध्ये आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.
Web Title : viral video muralitharan son does bowling action exactly like his father video went viral
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update