बारामती : बहुजननामा ऑनलाईन – Viral Video | माळेगावमधील राष्ट्रवादीचे (Malegaon NCP) काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावरील गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे यांचा मोक्का न्यायालयाने (MOCCA Court) काही दिवसांपुर्वी जामीन मंजूर (Bail granted) केला. जामिनावर मुक्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी जयदीप तावरे यांना दुग्धभिषेक (milk bath) घालत जल्लोष साजरा केला. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे.
माळेगाव येथे 31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात 4 आरोपींना अटक (Arrest) केली होती. तसेच बारामती पोलिसांनी (Baramati police) मोक्का अंतर्गत कारवाई (Mocca action) केली होती. पोलिसांनी 15 दिवसांत या प्रकरणाचा तपास करुन मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची ही पहिलीच घटना होता. परंतु काही दिवसांनंतर रविराज तावरे यांच्या जबाबावरुन पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तापवेर यांना अटक केली होती.
जयदीप तावरे यांना अटक अटक केल्यानंतर माळेगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. यावेळी तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगाव येथे बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पोलिसांनी मोक्का न्यायालयात सदर गोळीबाराच्या गुन्ह्यात जयदीप तावरे यांचा हात नसल्याप्रकरणी युक्तीवाद कोर्टात केला.
त्यानंतर पुण्याच्या मोक्का न्यायालयाने तावरे यांची जामिनावर मुक्तता केली.
त्यामुळे ग्रामस्थांनी तावरे यांना दुधाने अंघोळ घालत आनंद व्यक्त केला.
सध्या सोशल मीडियावर दुग्धाभिषेकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Web Title :- Viral Video milk bath former sarpanch who released mocca bail shooting case video went viral.
Pune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती
Crime News | धक्कादायक ! कारमध्ये ‘सेक्स’ करताना 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू