बहुजननामा ऑनलाईन टीम : अॅक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर भाष्य करत आल्यानं चर्चेत आहे. पुन्हा एकदा त्यानं ट्विट करत आंदोलनावर सवाल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काहींनी यावर टीका केली आहे तर काहींनी त्याला म्हटलं आहे की, विष नको पसरवूस.
दिलजीतनं त्याच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. यात एक वृद्ध शिख धर्मीय व्यक्ती थंडीत खुल्या आभाळाखाली अंघोळ करताना दिसत आहे. या सोबत त्यानं लिहिलं की, तुमचं तुम्हालाच माहित. ही देवासारखी लोकं तुम्हाला आतंकवादी वाटतात. मानवता नावाचीही काही गोष्ट असते यार.
https://twitter.com/diljitdosanjh/status/1339418299474460673?s=20
दिलीजीतच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एकानं यावर कमेंट करत लिहिलं की, विष नको पसरवूस. तू एका चांगला कलाकार आहेस. एका व्यक्तीप्रति तुझा राग आहे तर त्याला देशावर लागू नको करू. इज्जत कमवायला वेळ लागतो. त्याला गमावू नकोस.
https://twitter.com/Sushmitasharm/status/1339418972156903424?s=20
आणखी एकानं कमेंट केली की, दिलीजीत पाजी आमचं पंजाबवर प्रेम आहे. आमचं शेतकऱ्यांवर प्रेम आहे परंतु खलिस्तानींवर नाही.
https://twitter.com/kr_mukeshsharma/status/1339418967862091776?s=20
एकानं तर असंही म्हटलं की, दिलजीत ही लढाई वैयक्तीक बनवू नकोस. तथ्य आणि आकडेवारी सोबत याकडे निष्पक्ष पणे पहा. तू समजदार आहेस.
https://twitter.com/apurvapundir/status/1339419516665618439?s=20
https://twitter.com/PiyushJ9356/status/1339437605260152833?s=20