नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये राजीनामा सत्र सुरूच आहे. याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबरमध्ये वैयक्तिक कारणांसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आरबीआयमध्ये सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य (viral acharya) यांनी कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधी राजीनामा दिला आहे. हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांना २३ जानेवारी २०१७ रोजी या पदावर नियुक्त झाले होते. त्याचा कार्यकाळ ३ वर्षाचा होता. पण तो संपण्याच्या ६ महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य हे २०२० नंतर अमेरिकेत जाणार होते. आता या वर्षी ऑगस्टमध्येच अमेरिकेत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जुलै महिना संपण्याच्या काही दिवस आधीच आचार्य पद मुक्त होतील. आचार्य यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. राजीनाम्यासंदर्भात अधिक विचारले असता त्यांनी सांगितले की, शाळेत असताना माझ्या शिक्षकांनी सांगितले होते, जेव्हा तुमचे काम बोलते तेव्हा तुम्ही बोलण्याची गरज नसते.
याआधी उर्जित यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यांनी गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर आचार्य देखील राजीनामा देतील अशी चर्चा होती. आचार्य यांच्या प्रमाणेच उर्जित यांनी देखील वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.
Reserve Bank of India (RBI) Deputy Governor, Viral Acharya has resigned six months before the scheduled end of his term. He had joined RBI in 2017. (file pic) pic.twitter.com/RyxAt6fmAN
— ANI (@ANI) June 24, 2019