बहुजननामा ऑनलाईन टीम : विधानसभा निवडुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. हा पराभर पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. पुढे काय करायचे ? कोणत्या मार्गाने जायचे ? यासंबधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर आज ट्विटरवर भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले आहे.
या गोष्टीमुळे पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का ? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी दुपारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. लोणीकर यांच्या भेटीनंतर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पंकजा यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. तावडे यांच्याबरोबर माजी राज्यगृहमंत्री राम शिंदे हे बरोबर असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांची रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे काल त्यांनी सांगितले होते.
Visit : bahujannama.com