मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गुजरात विधानसभा 2022 साठी होणाऱ्या निवडणुकांचे आज (दि. 1) पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. भाजप, आप आणि काँग्रेस हे या निवडणुकीत प्रमुख पक्ष आहेत. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, तर आपला आपले भविष्य या निवडणुकीत पाहायचे आहे. काँग्रेस नेहमीप्रमाणे तग धरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता महाराष्ट्रातील शिवसेनेच्या खासदाराने गुजरातविषयी एक भाकीत केले आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गुजरात विधानसभेत भाजप विजयी होईल, असे म्हटले आहे. विनायक राऊत म्हणाले (Vinayak Raut), गुजरात विधानसभेत भाजप विजयी होईल, परंतु त्यांना अत्यंत कमी बहुमत मिळेल.
त्यांनी राज्य सरकारवरदेखील टीका केली आहे. राऊत म्हणाले, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असे मला बिलकूल वाटत नाही. मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे केवळ वावड्या पिकवल्या जात आहेत. पळून जाणाऱ्या गद्दारांना थांबविण्यासाठी ही अफवा आहे. विस्तार करू म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिषे दाखविली जातात. पण, प्रत्यक्षात विस्तार काही होणार नाही. राज्यात महिला मुख्यमंत्री करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. शिवसेना-महाविकास आघाडीकडून तसा प्रयत्न होत असेल, तर महाराष्ट्रातल्या महिलांचा तो सर्वोच्च बहुमान असेल, असे राऊत (Vinayak Raut) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंगलप्रभात लोढा यांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचादेखील यावेळी राऊतांनी समाचार घेतला.
दुर्दैवाने या सर्व नतद्रष्ट लोकांना कोणाचीही तुलना करण्यासाठी केवळ शिवाजी महाराजच दिसतात.
शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्यासोबत कोणाची तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी, मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आणि क्लृपत्या वापरल्या होत्या. एकनाथ शिंदें यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी खालेल्या ताटामध्ये घाण केली होती, असे विनायक राऊत म्हणाले.
Web Title :- Vinayak Raut | shiv sena mp vinayak raut comment on gujrat election
हे देखील वाचा :
Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..
Ravish Kumar | हा माझा नवीन पत्ता, राजीनाम्यानंतर रवीश कुमारांनी केले ट्वीट