मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन – दीपावलीचा सण शेतकरी आणि त्यांना साथ देणारी सर्जा राजाची जोडी, गाई, वासरे याना पहाटे स्वच्छ करू रंगीबेरंगी कलरने सजावट, शिनग्यांना फुगे लावून सोन्याचा घास भरू आरती उतरून गोठ्या बाहेर पेंढ्याची गंजी पेटून त्यावरून जनावरे उडवून त्यानं संपूर्ण दिवस जंगलात मनसोक्त सोडून दिवाळी साजरी केली जाते.
खेड्या पांड्यनं मध्ये घरातील महिला मंडळी करंज्या, चल्या, सुबक रांगोळ्या तर लहान मुले किल्ले सजावट करण्यात तल्लीन होतात बळीराजा पहाटे पासून गाई ,वासरे, बैल जोडी सजवण्यात दिवाळी सणाचा आनंद घेण्यात मग्न होऊन जातात याच पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यातील खोपिवली, मिल्हे यागावन मध्ये मोठ्या प्रमाणात झोम्बी पाहण्यास मुरबाड, शहापूर, कल्याण, कर्जत तालुक्यातून नागरिक आनंद लुटण्यासाठी येतात
गावची दिवाळी मनाला सुखद आनंद देणारी दु:ख दूर करून नवीन भरारी घेणारी स्वर्गाहून सुंदर माझं गाव हा दिवाळी सनाने अनुभवण्यास मिळते घरा समोरील अंगणात रांगोळीचा सडा, सुबक सजवलेली बैल जोडी, रुबाबदार बाल कलाकारांचे किल्ले, गृहिणीनी बनविलेल्या स्वादिष्ट लाडू, करंज्या आनंद वेगळाच अनुभवण्यास मिळतो.
सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ले संवर्धन या उपक्रमातून सिद्धगड किल्ला दिव्यांच्या रोषणाईने उजाळून गेला होता. अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धेत प्रथम, दुतीय असे परितोषीक देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी या बालकलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. गावची दिवाळी नेहमी प्रमाणे साजरी न होता तोंडाला मास्क, सोशल डिस्टंस पालन करत शुभेच्छा देत दिवाळी साजरी झाली.