मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई शहरला पावसाने (Mumbai Rain) अक्षरश: झोडपले आहे. शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. मुंबईतील चेंबूर (Chembur) आणि विक्रोळी (Vikhroli) भागात दरड कोसळल्याची (Vikhroli landslide) घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्घटना घडली आहे. ती देखील विक्रोळीत. कालच विक्रोळीत घरावर दरड कोसळून (Vikhroli landslide) 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना आज पुन्हा याच भागात दरड कोसळली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विक्रोळीतील पार्क साईट (Park site) भागात आज दरड कोसळली. कैलास कॉम्प्लेक्स जवळील पॉपटेट्स या हॉटेलजवळ दरड कोसळली. ही दरड उभ्या असलेल्या दोन कारवर कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरड कोसळल्याचे फोटो समोर आले आहेत.
Petrol Price | खुशखबर ! ऑगस्टपेक्षा स्वस्त होऊ शकते पेट्रोल, जाणून घ्या काय आहे OPEC देशांचा प्लान
दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू
दरम्यान विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील पंचशील नगर भागात दरड ( residential building collapsed) कोसळल्याने ही दुर्घटना घडली. विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही दुर्घटना घटली. शनिवारी मध्यरात्री पावणे तिनच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली.
Web Title : vikhroli landslide vikhroli west again landslide near pop tates kailash complex park site no casualties
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pockets |अॅपद्वारे मोबाइल रिचार्जवर मिळवा 10 % कॅशबॅक, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस