अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील(Vikhe Patil) हे आयुष्यभर गाव, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी राबले, त्यांचं आयुष्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी आहे. विखे-पाटील(Vikhe Patil) यांनी सहकारासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अतिशय जवळून पहिल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या कष्टामुळेच ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला, त्यांनी सत्तेतून राजकारणातून समाजहित साधलं, असे प्रतिप्रादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विखे पाटलांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
Prime Minister Narendra Modi releases autobiography of Dr. Balasaheb Vikhe Patil & renames Pravara Rural Education Society as ‘Loknete Dr. Balasaheb Vikhe Patil Pravara Rural Education Society’, via video conferencing.
Maharashtra CM Uddhav Thackeray also present for the event. pic.twitter.com/nNXiSgcAr1
— ANI (@ANI) October 13, 2020
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संपन्न झालं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. त्याचबरोबर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, डॉ. सुजय विखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Whether it is Dr. Balasaheb Vikhe Patil's contribution towards development and education for villages and poor or his efforts towards the success of cooperatives in Maharashtra, his work will inspire generations to come: Prime Minister Narendra Modi https://t.co/fR1BQ2BZp3 pic.twitter.com/W5GF5TZUnl
— ANI (@ANI) October 13, 2020
यावेळी बोलताना मोदींनी सहकार चळवळ आणि धर्मनिरपेक्षता यावर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘सहकार चळवळ ही खरी धर्मनिरपेक्ष असल्याचं विखे-पाटील म्हणायचे. सहकार चळवळ कोणत्याही जातीधर्माची बटीक नाही. सगळ्या समाजाला या चळवळीने प्रतिनिधित्व दिलं आहे, हे विखे-पाटील यांचे शब्द होते. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे ही चळवळ सगळ्यांची आहे,’ असे त्यांनी म्हटलं.
Prime Minister Narendra Modi releases autobiography of Dr. Balasaheb Vikhe Patil & renames Pravara Rural Education Society as ‘Loknete Dr. Balasaheb Vikhe Patil Pravara Rural Education Society’, via video conferencing.
Maharashtra CM Uddhav Thackeray also present for the event. pic.twitter.com/nNXiSgcAr1
— ANI (@ANI) October 13, 2020
‘देह वेचावा कारणी’ समर्पक असे नाव विखेंच्या आत्मचरित्राला देण्यात आलं आहे. विखेंच्या संपूर्ण आयुष्याचं सार या नावात आहे. सत्ता, राजकारणाचा वापर विखेंनी समाज कल्याणासाठी केला. त्यांच्यासाठी सत्ता ही लोककल्याणाचं माध्यम होत. देशात कोठेही ग्रामीण शिक्षणाची चर्चा नसताना त्यांनी ग्रामीण शिक्षणासाठी पुढाकार घेतला. अविरत प्रयत्न सुरु ठेवले. प्रवरा संस्था उभी केली. संस्थेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला. त्यांनी कायम समाजाच्या भल्याचा विचार केला, असे सांगत पंतप्रधानांनी विखे-पाटील यांच्या कार्याची स्तुती केली.