बहुजननामा ऑनलाईन – आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील सीसीटीव्हीत अशी एक घटना कैद झाली आहे की ते वाचून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. विजयवाड्यात प्रदीपकुमार नावाच्या एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि नंतर तिच्या धडापासून डोके वेगळे करून एका हातात तिचे डोके आणि एका हातात चाकू घेऊन तो परिसरात आरामात फिरू लागला.
दरम्यान आरोपी प्रदीपच्या हातात महिलेचे डोके पाहून लोक घाबरून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा खळबळजनक प्रकार विजयवाड्यातील श्रीनगर भागात घडला आहे. रविवारी प्रदीपकुमार नावाच्या व्यक्तीने पत्नी मणिक्रांतीची प्रथम घराबाहेर चाकूने हत्या केली. मग एका हातात बायकोचे चिरलेले डोके आणि दुसर्या हातात चाकू घेऊन तो निर्भिडपणे रस्त्यावर फिरु लागला.
कॉलनीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना नोंदविण्यात आली. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आणि लोक तिथे जमा झाले. अहवालानुसार, हत्येनंतर आरोपी पतीने पत्नीचे कापलेले डोके कालव्यात फेकले आणि स्वत: ला सत्यनारायणपुरम पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. प्रदीप आणि त्याची पत्नी मणिक्रांतीचे ५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान पतीने छळ केल्याचा खटला दाखल झाल्यापासून त्यांच्या संबंधामध्ये कटूपणा आला होता.