Vidhan Parishad | राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय, आजच शपथविधी होणार? राज्य सरकारकडून राजपत्र जारी
मुंबई : Vidhan Parishad | राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2024) तोंडावर आहेत. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची (Central Election Commission) पत्रकार परिषद होणार आहे. या धावपळीत महायुती सरकारने (Mahayuti Government) राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि.१५) दुपारी १२ वाजता सात आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळामध्ये उपसभापती निलम गो-हे (Neelam Gorhe) यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार असून महायुतीकडून ७ जणांची राज्यपाल नियुक्त आमदार (MLA Appointed by Governor) म्हणून वर्णी लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र (Gazette) जारी करण्यात आलं आहे.
मंगळवारी शपथ घेणाऱ्या ७ नावांमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा समावेश आहे. त्यांच्यासह विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ (Pankaj Chhagan Bhujbal), इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील, मनिषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
Comments are closed.