बहुजननामा ऑनलाईन टीम
देशभरात कोरोनाची भीती वाढल्यामुळे लोक एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याचे दिसून आले आहे. सर्वांनाच संसर्गाची भीती वाटत आहे. अशातच धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एका पांढर्या चादरीत माणूस दिसत आहे. तो मृत आहे की जिवंत हे पाहण्यासाठी तिथे गर्दी जमा झाली होती. त्यानंतर आवाजामुळेतरुण घाबरून उठून उभा राहिला. त्यानंतर लोक मृत माणूस जिवंता झाला भ्रमात पऴून गेले.
कोरोना काळात हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना ’आजकाल लोक शांतपणे झोपूही देत नाहीत’ असे मजेशीर कॅप्शन देऊन व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत 9 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 2 हजारहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक आणि रिट्वीट केला आहे. व्हिडीओमध्ये पांढर्या रंगाची चादर ओढून तरुण रस्त्याच्या कडेला झोपला आहे. तो मृत असल्याचे लोकांना वाटल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पण प्रत्यक्षात जेव्हा या तरुणाला जाग आली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...
Read more