पाटणा : वृत्तसंस्था – स्टडी टूरच्या नावाखाली गेलेल्या आमदाराचा तरुणीसोबत अश्लील नृत्य करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार एका तरुणीला आपल्याकडे ओढून तिच्यासोबत अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदरांनी ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमदार नेटक-यांकडून ट्रोल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बिहारमधील यदुवंश कुमार यादव असे या आमदाराचे नाव आहे. ते राष्ट्रीय जनता दलाचे आमदार असून स्टडी टूरसाठी मणिपुर येथे गेले होते. स्टडी टुरच्या नावाखाली आमदारांनी केलेल्या लीलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यादव एका तरुणीसोबत नृत्य करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने यदुवंश यादव यांच्यावर टीका होत आहे.
यदुवंश यादव आणि इतर तीन आमदार स्टडी टुरसाठी मणिपुरमधील मोरेह येथे गेले होते. मात्र, स्टडी टुरसाठी गेलेले आमदार जनतेच्या पैशांवर मौजमजा आणि मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आमदार तरुणीला जबरदस्तीने मिठी मरून तिच्यासोबत अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदारांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा कांगावा करत ज्याने कोणी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्याच्या विरोधात आब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.