मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयातील कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला असून त्यांनी पहिला फोन आपल्या लाडक्या लेकीच्या पित्याला लावला. त्या पित्याचे नाव नागेश पाटील असून umesh@mutal या त्यांच्या भावाच्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी अशोक चव्हाण यांचे आभारही मानले असून त्यांनी अशोक चव्हाण यांना एक फोन करण्याची विनंती केली आहे.
लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा VDO मी काल शेअर केला होता.
हा VDO बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजास सुरूवात केली व पहिला फोन त्यांनाच केला.https://t.co/tjJsJi6X6J https://t.co/gzS9fdrZCn pic.twitter.com/Ruom75wtvB— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 8, 2020
अशोक चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नागेश यांनी आपल्या मुलीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने आपल्या नवीन गाडीची पूजा केली आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘दोन लेकींचा बाब असल्याने बाप-लेकीच नातं काय असत, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल!’ असे म्हटले आहे. चव्हाण यांच्या ट्विटला रिप्लाय करत व्हिडिओमधील वडिलांच्या भावाने आपला मोबाईल नंबर देऊन लहान भावासाठी कृपया शक्य असेल तर एक फोन करावा, अशी विनंतीही केली.
मोबाईलवर हा VDO नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय.
दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल! pic.twitter.com/eDYBdBLfFk— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 7, 2020
टिकटॉकवरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, हा व्हिडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आज मंत्रालयातून कामकाजास सुरूवात केली व पहिला फोन त्यांनाच केला, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सांगितले. सोबतच पहिला फोन केलेला व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.