बहुजननामा ऑनलाईन टीम –आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साध्वी प्राची यांनी राहुल गांधींवर टीका करत नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार ही सर्व नेहरू घराण्याची देणगी असल्याचं म्हंटले आहे. मेरठ येथे एका कार्यक्रमात विएचपी नेता साध्वी यांनी हे विधान केले.
साध्वी प्राची यांचे वादग्रस्त विधान :
एका खासगी कार्यक्रमात मेरठमध्ये असलेल्या साध्वी प्राची यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. प्राची म्हणाल्या की, नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार हे सर्व नेहरूंच्या कुटुंबामुळे झाले आहेत. देशात नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले होते की बलात्काराची राजधानी म्हणून भारत विकसित होत आहे. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर साध्वी प्राची यांनी आता हे वादग्रस्त विधान केले.
अखिलेश बलात्काऱ्यांना वाचवतात :
साध्वी प्राची यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. अखिलेश हे सत्तेत असताना बलात्कार करणाऱ्यांना वाचवतात आणि विरोधात असताना आंदोलन करायला बसतात. शनिवारी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्र्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणाविरोधात मूक मोर्चावर बसले.
हैदराबाद एन्काऊंटर प्रशंसा :
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींच्या चकमकीबद्दल साध्वी प्राची यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले. हैदराबाद पोलिसांकडून शिकल्यानंतर उन्नाव प्रकरणावर उत्तर प्रदेश पोलिसांनी अशीच कारवाई केली पाहिजे होती. उन्नावच्या दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी साध्वी यांनी केली आहे.