पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बाभळीच्या फांद्या पेटवून दिल्यामुळे गाईसाठी आणलेला सुक्या चाऱ्याने पेट घेतला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्हेटर्नरी डॉक्टरचा चौघांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना कळस येथे एक वर्षापूर्वी (जानेवारी 2020) मध्ये घडली होती. मृत्यूचा अहवाल उशिरा आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डॉ. भरत दिवेकर (वय-65 रा. कळस, माळवाडी) असे मृत्यू झालेल्या व्हेटर्नरी डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र रामचंद्र दरेकर (वय-48), निखिल बाळू सपकाळ (वय-34), यतीन बाळू सकपाळ (वय-30 सर्व रा. कळस) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिवाजी दरेकर (वय-55 रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र याने बाभळीच्या फांद्या तोडून त्या पेटवल्या. त्यामुळे फिर्यादी शिवाजी यांनी गायीसाठी आणलेल्या सुक्या चाऱ्याने पेट घेतला. याचा जाब विचरण्यासाठी डॉक्टर भरत तिथे गेले. त्यावेळी आरोपींनी डॉक्टर भरत यांनी शिवीगाळ करुन लाकडी धोपटण्याचने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या डॉ. भरत यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप यांनी दिली.