मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार Dilip Kumar यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे.
Veteran actor Dilip Kumar has been admitted to PD Hinduja Hospital in Mumbai. He was having breathing issues since past few days, says his wife Saira Banu pic.twitter.com/eNn4hfhELL
— ANI (@ANI) June 6, 2021
दिलीप कुमार Dilip Kumar यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रविवारी सकाळी ८ वाजता खार येथील हिंदुजा रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.