मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Navy Leftnant Amogh Bapat | हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसाजवळ छितकुलहून सांगलाकडे निघालेल्या पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत गाडीतील 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एक नेव्ही अधिकारी अमोघ बापट (Navy Leftnant Amogh Bapat) यांचे निधन झाले. ते लेफ्टनंट होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही दुर्घटना आज (सोमवारी) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली असून भूस्खलनामुळे बास्पा नदीवरील पूल सुद्धा कोसळला आहे. दुर्घटनेत एकुण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 जण राजस्थानचे, 2 छत्तीसगढचे, 1 दिल्लीचा आणि एक मुळ महाराष्ट्राचा रहिवाशी असून एकाची ओळख पटलेली नाही. मृत नेव्ही लेफ्टनंट अमोघ बापट (Amogh Bapat) यांचे कुटुंब छत्तीसगडमध्ये कायम वास्तव्याला असून त्याचे पोस्टिंग अंदमान-निकोबार बेटावर (andaman nicobar island) होते.
तीन दिवसांपूर्वी कोरोबा या मूळगावी रजेवर आलेले अमोघ बापट हे मित्र सतिश कटवार यांच्यासोबत शिमला येथे पर्यटनासाठी गेले होते.
परंतु वाटेतच या दोघांवर काळाने घाला घातला.
अमोघ बापट 4 वर्षांपूर्वी नेव्हीत भरती झाले होते,
त्यांना 9 जुलै रोजी प्रमोशन मिळाले होते.
Web Title :- very sad news navy leftnant amogh bapat died tragic accident kinnour landslide himachal pradesh
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज