मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Varsha Gaikwad | एकीकडे कोरोनाच्या नव्या ओमाइक्राॅन व्हेरिएंट (omicron covid variant) विषाणूचे पडसाद गडद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोना रूग्णांची (Corona Virus) संख्या देखील महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. यातच आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. (Corona Test Report Positive)
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I'm fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने सध्या चाललेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये चिंता लागून राहिली आहे. कारण या अधिवेशनामध्ये काल (सोमवारी) गायकवाड या उपस्थित होत्या. दरम्यान, ‘मला आज सकाळी कळलं की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी,’ असं आवाहन ट्वीटच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
Web Title : Varsha Gaikwad | maharashtra school education minister varsha gaikwad become corona positive.
Pune Crime | धक्कादायक! शवविच्छेदन केलेल्या मृतदेहांचे अवशेष खातात भटकी कुत्री आणि डुक्करं