आझमगढ : वृत्तसंस्था – बिलारीगंजच्या घटनेवरील राजकारण आता तीव्र झाले असून समाजवादी पक्षाने पहिल्या दिवशी आंदोलकांवर झालेल्या कारवाईवर सरकारला घेरले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसने सपाचे प्रमुख अखिलेशसिंग यादव यांच्या विरोधात पोस्टर वॉर सुरू केले असून उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने शहरात पोस्टर लावले आहेत.
या पोस्टरमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधी निषेधादरम्यान मुस्लिम महिलांवरील पोलिस क्रौर्यावर अखिलेश यादव गप्प का आहेत, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर अखिलेश यादव आजमगड येथून बेपत्ता आहेत. पोस्टरवर अखिलेश यादव यांचे फोटो लावला असून पोस्टरमधील अखिलेश यांच्या तोंडावर पट्टी लावण्यात आली आहे.
सपाने नेहमीच मुस्लिमांसाठी अनुकूल असल्याचा दावा केला असल्यामुळे काँग्रेसचे हे पोस्टर वॉरला राजकीय दृष्टीने बघितले जात आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर मुलायमसिंह निवडणूक जिंकल्यानंतर आझमगडला आले नव्हते. तेव्हा भाजपचे अल्पसंख्यांक प्रकोष्ठचे नेते सुफियान खान यांनी सगडी परिसरात पोस्टर लावले होते.