नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय वाटाघाटींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. अनेक पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही एक दावा करत वंचित बहुजन आघाडीमधील अनेक कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्षात येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली.
मी मुख्यमंत्र्यांशी असहमत :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता होईल असे म्हटले होते. यास असहमती दर्शवत आठवले यांनी CM जरी म्हणत असले तरी मला मात्र असे वाटत नसून लोकसभेची समीकरणे वेगळी होती मात्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फारशी मतं मिळणार नाहीत असे सांगितले. तसेच वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधला असून ते RPI मध्ये येण्यास उत्सुक असल्याचे आठवलेंनी सांगितले. काँग्रेसशी आघाडी करण्याची वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची इच्छा नसून त्यामुळे ते काँग्रेससमोर अटी टाकत असल्याचे मतही त्यांनी मांडले.
एमआयएमचा निर्णय योग्य :
या पत्रकार परिषदेत आठवले यांनी मिस्किलपणे वंचित-एमआयएमची युती तुटण्याचा धागा पकडत ‘एमआयएम जरी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली असली तरी आम्ही महायुतीतून बाहेर पडणार नाही’ असे म्हटले. त्याचवेळी एमआयएमने वंचितसोबतची युती तोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून वंचितला एमआयएमचा फायदा झाला असून एमआयएमला काहीही फायदा होत नसल्याचे सांगितले. कारण एमआयएमचा एकमेव खासदारही एमआयएमच्या चिन्हावर निवडणून आला आहे, त्यामध्ये वंचितचे योगदान दिसत नाही असेही ते म्हणाले.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत