Valmiki Karad Surrenders At CID Office In Pune | सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीसमोर शरण; म्हणाला – ‘… तर शिक्षा भोगायला तयार’ (Videos)

पुणे : Valmiki Karad Surrenders At CID Office In Pune | मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) एक प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड याला गेले अनेक दिवस पोलीस शोधत होती. शेवटी तो आज सकाळी पुण्यातील सीआयडी कार्यालयात (Pune CID Office) शरण आला. आपण दोषी असेल तर शिक्षा भोगायला तयार असल्याचे त्याने एक व्हिडिओ जारी करीत त्यात सांगितले आहे.
मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई सुरु केली आहे. सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलीस गेले काही दिवस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. तरीही एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. वाल्मिक कराड याने पुण्यात शरणागती पत्करली, असे वृत्त दोन दिवसांपूर्वी पसरले होते. परंतु, ही अफवा ठरली होती. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्यानेच शासन त्याला अटक करु शकत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.
शेवटी त्याने सीआयडी समोर आज शरणागती पत्करली. सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस ठाण्यात खोटी खंडणीची फिर्याद दाखल केल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफीसमध्ये सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगायला तयार आहे, असे कराड याने या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.
Comments are closed.