बहुजननामा ऑनलाइन टीम – गुजरातच्या वडोदरा येथे वाघोदिया क्रॉसिंग महामार्गावर बुधवारी सकाळी टेम्पो आणि डंपरच्या धडकेत (Gujarat Road Accident) 11 जण ठार आणि 19 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू(Terrible accident )आहेत.
सुरतपासून पावागडकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात 11 जण ठार, तर 19 लोक जखमी झाले आहेत. हा अपघात कपूरई ते अहमदाबाद या वाघोडिया क्रॉसिंग हायवेवर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डंपर आणि टेम्पो यांच्यात झाला. हे सर्व लोक पावागड येथे दर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये 1 मूल, 5 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.
घटनेचे गांभीर्य पाहून अतिरिक्त सीपी जिल्हाधिकारी, सीडीएम आणि एसएसजी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रंजन अय्यरही घटनास्थळी दाखल झाले. वडोदराच्या जिल्हाधिकारी शालिनी अग्रवालदेखील सकाळी घटनास्थळी पोहोचल्या. त्या म्हणाल्या की, सुरतहून पावागडकडे जाणाऱ्या एका ट्रकचा आज सकाळी वडोदराजवळ अपघात झाला. सर्व लोकांना एसएसजी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
जखमींना अग्निशामक दलाने बाहेर काढले आणि सयाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असल्याचे सांगण्यात आले. सीएम विजय रूपाणी यांनीही या घटनेवर ट्विट केले आहे. रूपाणी यांनी लिहिले की, वडोदराजवळील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जे जखमी झाले आहेत, त्यांना लवकरात लवकर बरे करण्यात यावे. मी दिवंगत आत्म्यांसाठी प्रार्थना करतो.
वडोदराचे पोलीस आयुक्त आर. बी. ब्रह्मभट्ट म्हणाले, ‘पाच महिलांसह जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मिनी ट्रकमध्ये जवळपास 25 जण होते, जिने ट्रक ट्रेलरला मागून धडक दिली.’
वाघेला म्हणाले की, मृत्यू झालेले 10 जण सुरत शहरातील वराछा भागातील असून, ते पंचमहाल जिल्ह्यातील पावागडजवळील एका प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी जात होते. वराछाच्या काही कुटुंबांनी पावागड, वडताल आणि डाकोर (खेडा) येथील मंदिरांना भेट देण्यासाठी मिनी ट्रक भाड्याने घेतली होती. त्यांनी सांगितले की अपघाताचे कारण शोधले जात आहे.