नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vaccine Certificate | जर देश-विदेशात कुठेही जायचे असेल तर COVID-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट सध्या खुप महत्वाचे आहे. आतापर्यंत कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याच्या दोन पद्धती होत्या – पहिली CoWIN पोर्टल आणि दुसरी आरोग्य सेतू अॅप. आता भारत सरकारने WhatsApp सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे व्हॅक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड (Vaccine Certificate Download) करणे आणखी सोपे झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता तुम्ही MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबोटवरून डाऊनलोड करू शकता. याची घोषणा सरकारने मागील वर्षी केली होती. व्हॉट्सअपद्वारे COVID-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत जाणून घ्या…
– यासाठी अगोदर MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअप नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर 9013151515 आहे.
– नंबर सेव्ह झाल्यानंतर व्हॉट्सअप अॅप उघडा.
– यानंतर चॅट लिस्टमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट सर्च करा.
– मिळाल्यानंतर चॅट उघडा आणि डाऊनलोड सर्टिफिकेट टाईप करा.
– आता व्हॉट्सअप चॅटबोट रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सिक्स डिजिट ओटीपी पाठवेल.
– यानंतर चॅटबोट कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट पाठवेल. येथून ते डाऊनलोड करा.
जर इथे व्हॉट्सअप एरर दाखवत असेल तर तुम्ही पहिल्या प्रमाणे कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु अॅपवर सुद्धा जाऊ शकता.
Web Title :- Vaccine Certificate | how to download covid 19 vaccine certificate via whatsapp check details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 204 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास