पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यातील हडपसर येथे उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 31) करण्यात आले होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (दि. 1) आज लसीकरण बंद असल्याचे फलक केंद्राबाहेर लावण्यात आले आहे. उद्घाटन झालं पण लसच उपलब्ध नसल्याने हे केंद्र बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. उदघाटन झाल्याच्या वर्तमानपत्रातील बातम्या वाचून अनेक जेष्ठ नागरिक निराश होऊन घरी परतल्याचे चित्र दिसून आले.
एकीकडे वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडे अपुर लसीकरण यामुळे राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. दरम्यान जून महिन्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे लसीकरणाचा लाभ नेमका कधी मिळतो, हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या आतापर्यंतच्या दोन लाटांमध्ये एप्रिलमध्ये संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक झाल्यानंतर मे महिन्यात कोरोना रुग्णसंख्या बरीच नियंत्रणात आली आहे. मे महिन्यात दैनंदिन करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक राहिले. गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारांपेक्षा कमी आहे.
संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या
जिमचा ‘प्रभाव’ पाहण्यासाठी तिनं काढले अंतर्वस्त्रात फोटो, ट्रेनरला पाठविल्यानंतर पुढं झालं असं काही…
मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू
जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्यावर येईल Instant Glow
पोलिसांची शासकीय गाडी मद्यपी चालकाच्या हाती, शिक्रापूर-चाकण चौकातील खळबळजनक प्रकार