लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये अयोध्येत भगवान रामाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक निधी हा सीएसआर फंड आणि दानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्याबरोबरच फूड प्लाझा आणि पर्यटन सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६१ हेक्टर जमीन खरेदी करण्यात येणार आहे. या जमीन खरेदीसाठी ४४६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर पर्यटन विकासासाठी विशेष पर्यटन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. सारनाथ आणि लालपूर येथे ही पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार आहे.
या पोलीस ठाण्यासाठी मोफत जमीनदेखील देण्यात येणार आहे. तसेच उत्तर प्रदेश नागरीय नाविकरण ऊर्जा विकास अधिकरण या मंत्रालयांमार्फत सौर ऊर्जा नीती २०१७ अंतर्गत ५०० मेगावॅट क्षमता निर्माण करण्याची निविदा मागविण्यात येणार आहे. दरम्यान, बुंदेलखंड आणि गोरखपूर लिंक एक्सप्रेस वे च्या विकासकामांची निवड करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या