नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील शाहजहाँपूर येथे आज मंगळवार (27 ऑगस्ट) रोजी सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन टेंम्पोना जोरदार धडक दिली. या अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण या अपघातात जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 वर झालेल्या या अपघातात मृतांमध्ये एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.
भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दोन टेंम्पोना धडक बसली. सीतापूरहून जाणाऱ्या या ट्रकने एका टेम्पोला मागून धडक दिल्याने हा टेम्पो एका मोठ्या खड्ड्यात पडला. त्यानंतर पुढे जाऊन याच ट्रकने दुसऱ्या टेम्पोला देखील धडक दिली. या दोन्ही टेंम्पोमधील 15 जणांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देखील देण्याची घोषणा केली आहे.
15 people killed after a truck overturns on two tempos in
district Shahjahanpur. CM Yogi Adityanath has taken cognizance of the incident and directed district administration to provide medical care to those injured and appropriate compensation. pic.twitter.com/wzh9Wmt8PT— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 27, 2019