नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सोशल मीडियावर एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे ज्यात दावा केला जात आहे की, एका माणसाने 6 तास उभं राहून विमानातून प्रवास केला कारण त्याच्या पत्नीला तीनही सीटांवर झोपता यावं. एका इंग्रजी वृत्तानुसार, अमेरिकेतील इंडियानाचे रहिवासी कोच कोर्टनी ली जॉन्सनने हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, पती जवळपास 6 तास उभा होता. नंतर या फोटोच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसले.
या फोटोची पुष्टी अद्याप झालेली नाही. परंतु हेदेखील समोर आलेलं नाही की, महिला सीटवर का झोपली होती. परंतु सोशलवर मात्र या फोटोमुळे वाद उफाळला आहे. काहींनी याला प्रेम म्हटलं आहे तर काहींना याला क्रूरता म्हटलं आहे. काहींनी तर सत्य जाणून न घेताच पत्नीवर अॅब्युजिव्ह कमेंट केली आहे, पतीचा छळ करणारी असं तिला म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं की, जर हा व्यक्ती फ्लाईटचा मालक नव्हता तर हा फोटो फेक आहे. याचा अर्थ त्याने फ्लाईटच्या नियमाकडे लक्ष वेधले आहे. फ्लाईटचे नियम अशा प्रकारच्या प्रवासाला परवानगी देत नाही असे त्याने सांगितले आहे.
एका युजरने महिलेला सेल्फीश म्हटले आहे तर अनेकांनी फोटोच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने विचारले की, कोणती एअरलाईन्स 6 तास उभं राहण्याची परवानगी देते ?
फोटो काढणाऱ्या जॉन्सन यांनी फोटोमधील स्थितीला खरं प्रेम म्हटलं आहे. काहींनी याला उत्तर देताना म्हटले की, पार्टनरकडून प्रेमासाठी हा मार्ग अवलंबला जात असेल तर त्यांना सिंगल राहणं जास्त आवडेल.