मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – झारखंडमध्ये जमावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तबरेज अन्सारीचा उल्लेख करत टिक टॉक अपवर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी मुंबईतील पाच तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याला काही वेळातच प्रसिद्धी मिळाली.
काय म्हटले आहे व्हिडीओमध्ये ?
झारखंडमधील तबरेज अन्सारी याचा उल्लेख या व्हिडीओमध्ये आहे. त्या या तरुणांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. जर तबरेजच्या मुलाने उद्या बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो असे म्हणून नका. असे या व्हिडीओत म्हटले आहे.
कुणी केली तक्रार ?
शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोलंकी यांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार करत कारवाई करण्याची विनंती केली. त्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेतली आणि मुंबईच्या सायबर सेलने त्यांच्याविरोधात तक्रार केली.
धार्मिक तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळे गुन्हा
या व्हिडीओमुळे धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या टिक टॉक अकाउंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ तयार करणाऱ्या आणि त्यात दिसणाऱ्या तरुणांचा शोध सुरु आहे. असी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
तरुणांचे एकत्रित ४ कोटी फॉलोअर्स
या पाच तरणांनी टीम ०७ नावाने व्हिडीओ बनवून तो अपलोड केला होता. त्यात फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारूकी यांचा समावेश आहे. तर या पाच तरुणांचे एकत्रित फॉलोअर्स तब्बल ४ कोटी आहेत. टिक टॉककडून त्यांचे अकाउंट सस्पेंड केले आहे.